सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

smart Reading



   
पुस्तके वाचणारी अँड्रॉइड ॲप्स
     आजघडीला इंटरनेटवर असंख्य ई-पुस्तके उपलब्ध आहेत. व ती वाचण्यासाठी अनेक ॲन्ड्रॉइड ॲप्सही प्ले स्टोअर वर मिळतात. ही मोफत मिळणारी पुस्तके आपण हौसेने डाउनलोउड करतो, पण जशा आपण कागदी पुस्तके वाचतो, तितक्याच सहजतेने ई-बुक्स मात्र वाचु शकत नाही. याची अनेक कारणे आहेत. पण यावर उत्तरही ही ॲप्सच देतात.....

       जवळजवळ सर्वच Android ई-बुक रीडर ॲप पुस्तके Online वाचून दाखतात, पण असेही काही ॲप्स आहेत जी Offline असतानाही ई-बुक्स वाचू शकतात  त्यातील काही मला आवडलेल्या ॲपविषयी मी लिहीत आहे.



  1)    Cool Reader   :-  या ॲपचा वापर करुन आपण  .Epub,  .Mobi , .txt  या फॉरमॅट मधील पुस्तके  आवाजाच्या स्वरूपात वाचुन घेउ शकतो.

मर्यादा :  हे ॲप pdf स्वरुपातील पुस्तके चालवू शकत नाही, pdf  ऐवजी जर आपण epub  या दुस-या एका तेवढ्याच परिचीत स्वरूपात डाउलोड केल्यास ती आपण आपल्या मोबाइलवर ऐकू शकतो .





२)    AI Reader   :-  हे ॲप आपण Cool Reader ॲप ला पर्याय म्हणून वापरू शकता ..

मर्यादा :  हे ॲप pdf स्वरुपातील पुस्तके चालवू शकत नाही, pdf  ऐवजी जर आपण epub  या दुस-या एका तेवढ्याच परिचीत स्वरूपात डाउलोड केल्यास ती आपण आपल्या मोबाइलवर ऐकू शकतो .



  *    PDF  स्वरूपातील पुस्तके ॲन्ड्रॉइड मोबाइलवर कशी ऐकावी ?



        यासाठी प्ले स्टोअरवर @Voice Aloud Reader या नावाचे वेगळे ॲप मिळते , ते डाउनलोड करून त्याद्वारे आपण  pdf पुस्तके मोबाइलवर ऐकू शकतो.

        मर्यादा : हे ॲप कागदी पुस्तके स्कॅन करुन तयार केलेली ई-बुक्स वाचु शकत नाही.

  

*    मराठी ई-बुक्स ॲन्ड्रॉइड मोबाइलवर कशी ऐकावी ?
     ( Marathi/hindi e-book reading app)

         

        यासाठी पुढील कृती करा.....

        १.   प्ले स्टोअर चालु करा.

        २.   यात वरील डाव्या बाजुच्या कोप-यात टच करुन  My apps वर click करा.

        ३.   ॲप्स च्या यादीतून Google text to speech हे ॲप Update करा.
        ४.   यानंतर मोबाइलच्या Settings मध्ये जा, यात Language& Input मध्ये जा.

   ५.   स्क्रॉल डाउन करून Text to speech output वर click करा.


६.   यात Google text to speech पुढील सेटींग्स च्या चिन्हावर click करा.
Add caption


  ७.   यात Install voice data वर click करा.
  
८.    भाषांच्या यादीतून  Hindi निवडा . हिंदी भाषेचा Data डाउनलोड करा.
Add caption

  ९.  डाटा डाउनलोड झाल्यानंतर परत settings >language & input > text to speech output >                              google text to speech > settings चे चिन्ह >  language वर click करा.
Add caption


 १०.   English(India) ऐवजी Hindi (India) निवडा.
Add caption



 यानंतर आपण सुरूवातीला सांगितलेल्या ॲप्सपैकी कोणतेही ॲप वापरून pdf, Epub, .Mobi या फॉरमॅटमधील कोणतेही पुस्तक ऐकू शकता......

No comments:

Post a Comment