सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

पुणे जि.प.GPF स्लीप


पुणे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्या संकेतस्थळावर जिल्हा परिषद कर्मचारी यांचे ऑनलाईन भ.नि.नि. मासिक/वार्षिक विवरणपत्र          (Gpf Slip) सर्व कर्मचाऱ्यांना घरबसल्या किंवा आपल्या कार्यालयातच ऑनलाईन पहाता येते व त्यामुळे सबंधीतांना दरमहाचे भ.नि.नि. वर्गणी वित्त विभागात जमा झाली किंवा नाही हे देखील समजु शकते.  

जिल्हा परिषद पुणेचे( http://www.arthsarthipunezp.org)वित्त विभागामार्फत जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी परतावा / नापरतावा भ.नि.नि. च्या रक्कमा सुलभतेने व तात्काळ काढता येणेसाठी तसेच जिल्हा परिषद सेवतून सेवानिवृत्त होणारे कर्मचारी यांना पेन्शन विषयी लाभ तात्काळ मिळणेसाठी
1. भविष्य निर्वाह निधी 
2. गट विमा योजना 
3. पेन्शन इ.
 बाबतची माहिती ऑनलाईन भरून सदरचे फॉर्म अज्ञावलीत आपोआप तयार होऊन कर्मचारी यांची माहिती वरून सबंधीतांना देण्यात येणारे लाभाबाबतचे नमुने तयार होणार आहेत. 

अर्थसारथी संगणकीय आज्ञावलीमध्ये सबंधीत ठेकेदार/पुरवठादार तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांना त्यांचे देयकाबाबतची सद्य:स्थितीची माहिती ऑनलाईन घरबसल्या किंवा आपल्या कार्यालयातच पहावयास मिळणार आहे. यासाठी सबंधीत ठेकेदार/पुरवठादर व जि.प. कर्मचारी यांनी याबाबत अर्थसारथी प्रणालीवर आपली माहिती रजिष्टर करणे आवश्यक आहे. रजिष्टर केले नंतर सबंधीतांचा A/C  नंबर हा त्यांचा USER ID असेल तसेच Password सबंधीतांनी खालील प्रमाणे स्वत: तयार करावयाचा आहे. याबाबत सबंधीत ठेकेदार/पुरवठादार किंवा जि.प.कर्मचारी यांनी USER ID व  PASSWORD वापरून त्यांना आपल्या देयकाची सद्यस्थिती माहिती मोबाईलवर पहावयास मिळेल. 

  वित्त विभागामार्फत दरमहा जिल्हा परिषद सेवेतून जे कर्मचारी निवृत्त होतात त्यांना अदा करावयाच्या रकमा (उदा. पेन्शन/भ.नि.नि. इ.) माहिती दरमहा पुणे जिल्हा परिषद, पुणे चे संकेतस्थळ www.punezp.co.in वर प्रसिध्द केली जाते. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे पेन्शन मंजुरी आदेश व मंजुर झालेली भ.नि.नि रक्कम इ. माहिती  तात्काळ समजू शकते.
अद्ययावत माहिती / स्लीप मिळणेसाठी खालील  शब्दांवर क्लिक करा.
1. भविष्य निर्वाह निधी(GPF)
2. गट विमा योजना (GIS)
3. पेन्शन इ.
4. अर्थसारथी pdf पहा


GPF साठी  user id -  आपला GPF नं टाका.
                password- आपला  gpf नं टाका. 


7 comments: