सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

ज्ञानरचनावाद वर्ग सजावट व रचना

              ज्ञानरचनावाद वर्ग अध्यापन


    ज्ञानरचनावादी विचारसरणीनुसार नुसार शिकण्याची प्रक्रिया पुढील  तीन बाबीच्या  सम्यन्व्यातून घडून येते .
पूर्व ज्ञान 

        शिकवण्याची प्रक्रिया  हि सतत  चालणारी प्रक्रिया आहे.         त्यानुसार  या संज्ञेचा  अर्थ  बालक  विशिष्ट नवीन  घटक शिकण्यापूर्वी  त्या घटका संदर्भातील त्याची  आधीचीसमज  असा घेता येईल . वर्गातील प्रक्रियेत  शिक्षकाला  मुलाच्या पूर्वज्ञानाचा  विचार करून  अध्ययन – अनुभवाची  निवड व रचना करावी लागेल .
शिकण्याची तयारी  -      शिकणाऱ्यांची  शिकण्याची  तयारी करण्यासाठी त्याची  शिकण्याची इच्छा  व त्याची पात्रता  या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे शिकतांना  त्याची भावनिक अवस्था  कशा प्रकारची आहे  हेही  महत्त्वाचे ठरते .भावनिक स्थिरतेतून  भावनिक प्रसन्नतेकडे जाणारी  बालकांची  मन: स्थिती  हि शिकण्यासाठी  योग्य  स्थिती असते .
अध्ययन  अनुभव   -    बालकाला  ज्या अनुभावाद्वारे  नवीन ज्ञान प्राप्त  होणर असते  तो अध्ययन-अनुभव ; म्हणजे  जो अनुभव  आजवर  त्याने घेतलेला नव्हता असा अनुभव, नवीनता हे त्यांचे वैशिष्ट आहे .या अनुभावाद्वारे नविन माहिती कशा स्वरुपात विद्यार्थ्यांसमोर येते यालाही महत्त्व आहे .अध्ययन –अनुभव जितके संख्येने  जास्त , विषयाला / आशयाला सुसंगत  व समर्पक तेवढा अध्ययनाच्या प्रक्रियेत नेमकेपणा येतो .असे अध्ययन – अनुभव  विचारपूर्वक विद्यार्थांना पुरवणे हि जबाबदारी  शिक्षकाची आहे .    अश्या  प्रकारे  विद्यार्थ्यांचे  पूर्वज्ञान ,त्यांची शिकण्याची तयारी  आणि अध्ययन –अनुभव यांचा  योग्य समन्वय वर्गामधील अध्ययन –अध्यापन प्रक्रियेमध्ये घडवून आणावा लागेल. वर्गामध्ये शिक्षक  जे सांगतील  तसेच विध्यार्थी  करतात .शिक्षक  बोलतात तेच विध्यार्थी  ऐकतात .जोडवर्ग ,मोठे वर्ग , विषयांची  संख्या ,वेगवेगळया चाचण्या ,जोडीला एखादे  दुसरे अशैक्षणिक   काम या परिस्थितीमध्ये  वेळेत “पोर्शन “ संपवायची कसरत शिक्षक करत असतो . या प्रक्रियेत मुलांना  किती  समजले ,त्यांना काय वाटते , कोणती  गोष्ट त्यांना  कठीण जाते , त्यांना  काही अडले  आहे का, यांसारख्या  गोष्टीना  वेळच मिळत नाही  किंवा दिला जात नाही . लहान मुले  उपजतच बहुविध  क्षमतेची  असतात . ती त्यांच्या  अंगभूत क्षमंतानुसार  व गतीनुसार शिकतात  आणि वेगवेगळ्या  पद्धतीने  ज्ञानाच उपयोजन करतात .बालमानसशास्र आणि शिक्षणशास्राने आपल्याला शिकवलेले हे  धडे  वर्गावर्गात  मात्र दूर्लक्षिले  जातात .शालामंध्ये  बहुतेक वेळा व्याख्यानपद्धती ,फलक लेखन , पाठांतर ,सराव .गृहपाठ  या चाकोरीतून जाणे शिक्षकांना  व त्याची सवय झालेल्या विद्यार्थी, पालक , यांना सोयीचे जाते .अशा पदधतीने  अनेक वर्ष  शिक्षणाची प्रकिया  पार पडत आहे .परंतु याचा अंतिम निष्कर्ष मुले खरेच काही शिकतात का? शिकत  नसतील ,तर तो विद्यार्थ्यांचा  क्षमतेचा ,बुद्धीचा  किवा शिक्षकांच्या  कौशल्याचा दोष मानला जातो , परंतु हे कितपत  खरे आहे ? दोष असेल  तर तो “शिकवणे “ या पूर्वापार  चालत आलेल्या  संकल्पनेचा  दोष आहे ; हे आपण लक्षात  घेतले पाहिजे. म्हणूनच  आपण ‘शिकवणे  ‘ यावर  लक्ष  काढून घेऊन ते शिकणे यावर केंद्रित  केले पाहिजे ,ज्ञानरचानावाद हि हेच सांगतो .

                     चला रचनावादाचा अवलंब करूया //
           प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवूया //

                  //प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र //


                           ज्ञानरचनावाद वर्ग
क्र.
      तपशील-क्लिक करा


1


2


3


4

5


6


7


8


9


10


11



12



13



14



15



16



17



18



19



20



21



22



23




    No comments:

    Post a Comment