सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

दप्तराचे ओझे - समस्या व उपाय



दफ्तराचे ओझे- समस्या व उपाय.....    
                                                       

मा.उच्च न्यायालयाने आजच दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारला फटकारले आहे.
चला आपण या विषयाची संपुर्ण माहिती घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करायचे हे पाहू....

  • मुलांवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात शिफारसी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली होती.
  • शिक्षण संचालक महावीर माने यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाला सादर करण्यात आला.
  •  त्यातील शिफारसी चांगल्या असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले आणि यासंदर्भात काही सूचना केल्या. या अहवालाचा अर्जदारांनी अभ्यास करून आपले मत मांडावे, असेही न्यायालयाने सांगितले.
  • दप्तराचे ओझे किती असावे, याच्या मानकापेक्षा तिप्पट ओझे 12 वर्षांच्या मुलांच्या पाठीवर असते, असे निरीक्षण उच्चस्तरीय समितीने नोंदवले आहे.
  • याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली.
  •  सामान्यतः मुलांच्या वयाच्या 10 टक्के एवढेच दप्तराचे ओझे असावे, असे अपेक्षित आहे; मात्र 12 वर्षांच्या मुलांच्या दप्तराचे ओझे 30 टक्के, म्हणजे साडेतीन किलो असते, असेही समितीला आढळून आले आहे.
 राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशी 
  • मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सत्रनिहाय कमी पानांची एकत्रित पुस्तके काढावीत.
  •  एका दिवशी केवळ दोन किंवा तीन विषयांच्या तासिका असाव्यात.
  •  शाळेतील कपाटांत वह्या-पुस्तके ठेवावीत किंवा पुस्तकांचे दोन संच (घर आणि शाळेसाठी) करावेत.
  •  संगणकाद्वारे अभ्यास करावा.
  •  क्रीडा साहित्य शाळेनेच द्यावे आणि फिल्टर केलेले स्वच्छ पाणी पुरवावे.
अहवालातील निष्कर्ष
  •  ग्रामीण भागात दप्तराचे वजन कमी, शहरांत जास्त
  •  सीबीएसई, आयसीएसई शाळांची दप्तरे जास्त जड
  •  मणके, स्नायूंची झीज, डोकेदुखी, पाठदुखी, थकवा, वाढीवर परिणाम, मानसिक ताण, फुप्फुसांच्या कार्यक्षमतेत घट, सांधे आखडणे असे दुष्परिणाम
  •  10 वर्षांपेक्षा लहान 58 टक्के मुलांना त्रास
  •  12 वर्षांपेक्षा लहान 75 टक्के मुलांना त्रास
 इतर शिफारसी 

  •  दोन किंवा तीन महिन्यांच्या सत्रानुसार लहान पुस्तके छापावीत
  • भाषा, गणित, विज्ञान, इतिहास-भूगोल अशा तीन पुस्तकांची एकत्रित बांधणी
  •  बालभारतीने पुस्तक छपाईसाठी वजनाला हलका कागद वापरावा.
  •  गृहपाठाच्या वह्या दोन-तीन विषयांसाठी एकत्रित कराव्यात
  •  200 ऐवजी 100पानी वा त्याहूनही कमी पानांच्या वह्या घ्याव्यात.
  •  जाड कव्हरच्या वह्यांवर बंदी घालावी.
  •  गृहपाठाचे विषयनिहाय साप्ताहिक वेळापत्रक करावे.
  •  वह्यांऐवजी वर्कशीटचा वापर करून त्या वर्गातच जमा कराव्यात.
  •  वेळापत्रकात दररोज केवळ तीन विषयांच्या तासिका असाव्यात.
  •  कमी तासिकांमुळे वह्या व पुस्तके कमी लागतील
  •  स्वाध्याय, गाईड, मार्गदर्शक पुस्तके शाळेत आणू नयेत
  •  सीबीएसई, आयसीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांनी एकच पुस्तक निवडावे.
  •  संगणकाद्वारे ई-लर्निंगवर भर द्यावा.
  •  पुस्तकांऐवजी ऑडिओ, व्हिडीओ स्वरूपात अभ्यास व्हावा.
  •  ई-लर्निंग, टॅब्लेट पीसी, प्रोजेक्‍टर अशी डिजिटल क्‍लासरूम व्यवस्था.
  •  बालभारतीच्या संकेतस्थळावर पुस्तके उपलब्ध करून द्यावीत.
  •  शैक्षणिक संकेतस्थळे आणि साहित्याचा उपयोग करावा.

शाळांसाठी सूचना-
  •  वह्या व पुस्तके शक्‍यतो शाळेतच ठेवावीत किंवा पुस्तकांचे दोन संच करून एक शाळेत व एक घरी ठेवावा.
  •  वह्या, पुस्तके ठेवण्यासाठी शाळेत कपाटे, लॉकर ठेवावेत.
  •  क्रीडा साहित्य, पिण्याचे फिल्टर्ड पाणी शाळेनेच पुरवावे.


   

1 comment:

  1. आपला ब्लॉग उपयुक्त व माहिती पूर्ण आहे.

    ReplyDelete