सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

smart download



     आजच्या जगात प्रत्येक काम करताना आपल्या सर्वांना इंटरनेट आणि कॉम्प्युटर गरज पडते, किेंबहुना इंटरनेट आणि कॉम्प्युटर शिवाय आपण कोणतेही काम प्रभावीपणे , अचूक व गतीने करू शकणार नाही. कोणताही संदर्भ, माहिती अथवा अभ्यास असो किंवा मनोरंजन असो पदोपदी  अनेक फाइल आपण डाउनलोड करत असतो(गरजेच्या आणि गरज नसलेल्याही).. पण जर इंटरनेट कनेक्शन  स्लो असेल तर डाउनलोड करणे ही एक डोकेदुखी ठरते. अनेक वेळा अर्धेअधिक झालेले डाउनलाेड  बंद होते व परत सुरूवातीपासून डाउनलोड करावे लागते. ही डाउनलोडची प्रक्रिया सोपी करून देणारी अनेक ॲप आज उपलब्ध आहेत, पण ही सर्वच कुठेना कुठे आपला भ्रमनिरास करतात.पॉज केलेले डाउनलोड सुरूच होत नाही, पहिल्यापासून सुरू होते, हवी ती फाइल मिळत नाही,एक ना अनेक अडचणी येतात. आणि याच अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
     
इतर कोणत्याही ब्राउजर किंवा ॲप पेक्षा कितीतरी चांगला डाउनलोड चा अनुभव देणारे तंत्रज्ञान व ॲप्स आज इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहेत. त्यातीलच काही उपयुक्त माहिती येथे देत आहोत......

१.बिट टॉरेंट(Bit torrent) :

  ब-याच नविन व सर्वसामान्य इंटरनेट वापरकर्त्यांना परिचय नसलेले हे File sharing तंत्रज्ञान  डाउनलोड करण्यासाठीचे सर्वोत्तम तंत्र आहे. (खासकरून  2G सारख्या कमी गतीच्या इंटरनेट कनेक्शनसाठी हे प्रभावी साधन आहे)

        याद्वारे  डाउनलोड करण्यासाठी प्रथम आपणास एक बिट टोरेंट क्लायंट डाउनलोड करून घ्यावा लागतो(Android साठी ॲप स्वरूपात व PC साठी सॉफ्टवेअर स्वरूपात) . Bit torrent, U torrent, Vuze 

यासारखे अनेक क्लायंट इंटरनेटवर मोफत मिळतात.

        हे ॲप डाउनलोड केल्यानंतर इंटरनेटवरील कोणत्याही टोरेंट साइटला भेट देउन आपल्याला हव्या त्या प्रकारची फाइल निवडा. या टोरेंट साइट्सवर ॲपपासून ते HD चित्रपटापर्यंत व इ-बुक्स पासून ते मॅगझिन्स पर्यंत सर्व प्रकारच्या फाइल्स उपलब्ध असतात.

       काही प्रसिद्ध Torrent Websites खालीलप्रमाणे आहेत.

     १.  Thepiratebay

     २. Isohunt

     ३. bitsnoop

     ४. www.torrentz.eu

     ५. kickass.to 



         साइट उघडल्यानंतर निवडलेली फाइल डाउनलोड करण्यासाठी फाइलच्या नावासमोरील मॅग्नेट लिंकवर क्लिक करा.
 
यानंतर तुमचे बिट टोरेंट ॲप आपोआप सुरु होइल व ते तुम्ही निवडलेली टोरेंट फाइल डाउनलोडसाठी Add करण्याची परवानगी मागेल.  Add वर क्लिक करा.(ॲड्रॉइड साठी).

टोरेंट फाइलचे डाउनलोड पूर्णपणे सुरू होण्यासाठी थोडासा वेळीही लागू शकतो . पण एकदा सुरु झाल्यानंतर ते सामान्य डाउनलोडपेक्षा गतिने डाउनलोड करते व ते बंद पडले व कितीही वेळाने चालु झाले तरी जेथे होते तेथूनच चालू होते.
 
 डाउनलोड सुरु झाल्यानंतर टोरेंट फाइलमध्ये अनेक फाइल्स दिसतील, त्यातील हवी तीच फाइल टिक करुन तुम्ही इंटरनेट डेटा व वेळही वाचवू शकता.
 

टोरेंटसाइट या  फक्त फाइल्स ट्रॅक करतात, प्रत्यक्षात तुम्ही ही फाइल तुमच्यासारख्याच दुस-या अनेक डाउनलोड करणा-यांच्या मोबाइल व कॉम्प्युटरवरून डाउनलोड करता!!!!
 
 एकूणच एकमेका साह्य करु ..... या प्रकारचे हे तंत्रज्ञान आहे.
या तंत्रज्ञानाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी Wikipedia वर Bit torrent  search करा.




      २. डाउनलोड मॅनेजर :  इतर कोणत्याही साइटवरून (टोरेंट शिवाय) डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाइल किंवा PC वर असे सॉफ्टवेअर खूप उपयोगी ठरते.
       ॲन्ड्रॉइड साठी Advanced Download Manager (ADM)हे ॲप सर्वोत्तम आहे. हे ॲप प्ले स्टोअर वर मोफत मिळते.
        ॲप कसे वापरावे ?
     १.  सामान्य साइटवरून डाउनलोड वर क्लिक केल्यानंतर एक पाॅप अप विंडो,  Android downloader अथवा Advanced Download Manager यापैकी एका पर्यायाची फाइल डाउनलोडसाठी विचारणा करेल. यातून तुम्ही Advanced Download Manager निवडा व Use always वर क्लिक करा.
     २.   तसे न झाल्यास ब्राउजरच्या ॲड्रेस बार मधून डाउनलोड ॲड्रेस कॉापी करा व Advanced download Manager ओपन करून + वर क्लिक करा. व त्यात ॲड्रेस पेस्ट करा
     डाउनलोड सूरू होइल.

No comments:

Post a Comment