सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

नवीन स्मार्ट Apps


                                          Facebook lite

आपण सर्वचजण ॲन्ड्रॉइड मोबाइलवर Facebook वापरण्यासाठी फेसबुकचे ॲप वापरतो, पण हे ॲप खुपच मेमरी वापरते. यासाठी फेसबुकने फेसबुकलाइट हे फक्त 451 kb चे ॲप बनवले आहे, ते प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. हे ॲप डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर वर facebook lite असे सर्च करा.
 
 
         

               संगणकावर वापरा Android apps

संगणकावर मिळणाऱ्या softwares पेक्षा android apps हे हे वैविध्यपूर्ण आणि कमी साइझ घेतात,
अनेक वेळा हे apps मोठ्या पडद्यावर वापर व्हावा म्हणून किंवा इतर कारणांसाठी संगणकावर वापरावयाची गरज पडते, यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे bluestacks हे software होय.
      हे software वापरासाठी अत्यंत सोपे आहे. एकदा इंस्टाल झाल्यानंतर कोणत्याही apk file वर डबल क्लिक केल्यानंतर ती bluestacks मध्ये इंस्टाल होते. व संगणकावर हे app वापरता येते.

हे software डाउनलोड करण्यासाठी प्रथम www.bluestacks.com या website वर जा.

download for pc या वर क्लिक करा.१४ mb चे installer डाउनलोड होईल.

डाउनलोड झालेल्या file वर डबल क्लिक करून इंस्टाल करा.

bluestacks हे software इंस्टाल होईल.

इंस्टाल झाल्यानंतर हे software चालू करा. यावेळी तुमच्या pc वर net चालू पाहिजे. bluestacks साठी आवश्यक data डाउनलोड होईल. हा data साधारणतः ३०० ते ४०० mb च्या आसपास आहे . net जोडणी slow असेल तर हा data टप्प्या टप्प्या ने डाउनलोड होतो. pc बंद केला तरी डाउनलोड खंडित होत नाही. परत pc चालू केल्यास राहिलेला data डाउनलोड होतो.

संपूर्ण bluestacks इंस्टाल झाल्यानंतर तुम्ही यात app इंस्टाल अथवा डाउनलोड करू शकता. यात play store ची सुविधाही आहे

(टीप - bluestacks साठी संगणकामध्ये ग्राफिक्स कार्ड व साधारणतः १ gb पेक्षा जास्त RAM आवश्यक आहे.
डाउनलोड करण्यापूर्वी तुमच्या संगणकाची  comptibility तपासा.)

BlueStacks चे offline installer ही  
 www.bluestacks.com  वेबसाइट वर उपलब्ध आहे. साईज -  283MB
 
 
 
               

No comments:

Post a Comment